rashmi shukla 
पुणे

रश्मी शुक्लांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा; फोन टॅपिंग प्रकरणी निलंबनाची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात सध्या सचिन वाझे प्रकरणावरुन गदारोळ सुरु आहे. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाचे हे प्रकरण बरंच गुंतागुतीचं असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर पांघरुण घातल्याचा आरोप केला होता. यावेळी फडणवीसांनी ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल सादर केला होता. फडणवीसांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर देताना गंभीर आरोप केले होते. महाराष्ट्रात सरकार तयार करत असताना रश्मी शुक्ला सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करत होत्या असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांचाही फोन टॅप झाला असल्याची माहिती देत त्यांनी आरोप केला आहे. यासंदर्भात आता उमेश पाटील रश्मी शुक्ला यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल दाखल करणार आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे रश्मी शुक्ला यांची तक्रार करत निलंबनाची मागणी केली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी असताना रश्मी शुक्ला यांनी 20/ 8/ 2020 आणि 25/ 8 / 2020 या दिवशी राज्याचे पोलिस महासंचालक यांना गोपनीय अहवाल पाठविला होता. त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भामध्ये मध्यस्थी किंवा दलाली करणारे रॅकेट आणि त्यासंदर्भातील मोबाईल फोनचे सीडीआर तपासण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामध्ये काही लोकांचे सीडीआर संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. या सर्व नमूद अहवालामध्ये माझ्या नावाचा उल्लेख असल्याने आणि सदर अहवाल समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याने मी ही तक्रार करत आहे. या प्रकारामुळे मला व माझ्या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप झाला असून माझी आणि माझ्या कुटुंबाची मानहाणी झाली आहे. सदर प्रकारामुळे माझे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे मी रश्मी शुक्ला मॅडम यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT