Pune News sakal
पुणे

Pune News : स्वच्छ ग्राम स्पर्धेत बनवडी अव्वल ; विभागस्तरीय निकाल जाहीर,पुणे जिल्ह्यातील काळवाडी विभागात द्वितीय

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा विभागस्तरीय निकाल गुरुवारी (ता. २२) जाहीर झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा विभागस्तरीय निकाल गुरुवारी (ता. २२) जाहीर झाला. स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील बनवडी (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीने पुणे विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. या ग्रामपंचायतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांकाचा रोख १० लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला. पुणे जिल्ह्यातील काळवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीला विभागून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.

कोरोना संसर्गाच्या कालावधीतील म्हणजेच सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांचा हा संयुक्त निकाल जाहीर झाला. यामुळे सुमारे तीन वर्षांपासून असलेली निकालाची प्रतीक्षा अखेर संपली. यासाठी निवड झालेल्या गावांना एका खास समारंभात पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. मात्र दोन्ही वर्षांचा निकाल संयुक्तपणे जाहीर झाल्याने अनेक पात्र गावांवर अन्याय झाला आहे. दोन्ही वर्षांची तपासणी संयुक्तपणे एकावेळी केली असली, तरी वर्षनिहाय दोन स्वतंत्र निकाल करणे आवश्‍यक होते.

प्रत्यक्षात तसे झालेले नसल्याची प्रतिक्रिया पुणे जिल्ह्यातील सरपंचांनी दिली आहे. विभागस्तरीय प्रथम पुरस्कार रोख दहा लाख, द्वितीय पुरस्कार आठ लाख आणि तृतीय पुरस्कार सहा लाख रुपयांचा असतो. यानुसार यासाठी निवड झालेल्या गावांना दरवर्षी पुरस्काराची रक्कम दिली जाते. या नियमानुसार प्रत्येकी दहा लाखांचे दोन, आठ लाखांचे दोन आणि सहा लाखांचे दोन पुरस्कार जाहीर होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे होऊ शकले नसल्याचे सरपंचांनी सांगितले. यासंदर्भात पुणे विभागाचे विकास शाखेचे उपायुक्त विजय मुळीक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

स्वच्छ ग्राम स्पर्धेचा सविस्तर निकाल : बनवडी, ता. कऱ्हाड, जि. सातारा (प्रथम), काळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे व वाटंगी, ता. आजरा, जि. कोल्हापूर (विभागून द्वितीय), नांगोळे, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली व खंबाळे, ता. खानापूर, जि. सांगली (विभागून तृतीय).

विभागस्तरीय विशेष पुरस्कार

  • स्व. वसंतराव नाईक पुरस्कार : बनवडी, ता. कऱ्हाड, जि. सातारा

  • स्व. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : वाटंगी, ता. आजरा, जि. कोल्हापूर

  • स्व. आबासाहेब खेडेकर पुरस्कार : भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : ‘आम्ही मानवतेच्या दृष्टीने न्याय मागतोय’; ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT