rasta roko on road in Wagholi by barber community 
पुणे

वाघोली नाभिक समाजाचे अचानक रास्ता रोको

सकाळवृत्तसेवा

वाघोली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज पासून कडक निर्बंध लादले. हॉटेल, बार बरोबर सलूनची दुकाने बंद ठेवल्याने वाघोली नाभिक संघटनेने आज दुपारी अचानक पुणे नगर महामार्गावर रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली.

सुमारे 100 ते 150 सलून व्यावसायिक जमले होते. अचानक त्यांनी रस्त्यावर येत रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक कोंडी झाली. लोणीकंद पोलिसानी धाव घेत हा रास्ता रोको थांबविला. यानंतर वाघोली पोलीस चौकी समोर त्यांच्याशी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी संवाद साधला. दुकान बंद करून आमचा घास हिरावून घेतला जात असल्याचे या व्यासायिकांनी सांगितले.

कोरोनाचा विस्फोट सध्या झाला आहे. यामुळे शासनाने हे निर्बंध आणले आहे. तुम्हीही सहकार्याची भूमिका घ्या. तुम्ही तुमचे निवेदन द्या. आंदोलन करू नका. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही बोलतो. अशी विनंती मानकर यांनी व्यावसायिकांना केली. यानंतर त्यांचे प्रतिनिधी वगळता सर्व व्यावसायिक परत गेले. संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT