rate of beard cutting will increase from 10 January 
पुणे

मटण, दूधच नव्हे दाढी कटिंगही महागणार; नवे दर 'या' तारखेपासून

डी के वळसे-पाटील

मंचर : महाराष्ट्र राज्य सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबईसह राज्यातील ग्रामीण भागातही दाढी-कटिंग दरात वाढ करण्यात आली आहे. शहरी भागात 15 टक्के तर ग्रामीण भागात 10 टक्के दरवाढ शुक्रवार (ता. 10) पासून लागू होणार आहे. अशी घोषणा महाराष्ट्र राज्य सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरी भाग साधी दाढी 40 रुपये व केस कटिंग 60 रुपये तर ग्रामीण भागात साधी दाढी 30 रुपये व केस कटिंग 50 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले. मंचर- अवसरी फाटा (जि. पुणे) येथे गोरक्षनाथ टेकडी सभागृहात सोमवारी (ता. 06) राज्य सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या वतीने आंबेगाव तालुका शाखेच्या सर्वसाधारण सभेत दरवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी, सलुन ब्युटी असोसिएशन राज्याचे सचिव किसनराव कोऱ्हाळे, आंबेगाव तालुका सलून असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव क्षीरसागर, दत्तात्रेय जाधव, रतन कोऱ्हाळे, बंटी क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले, "महागाई व सलून व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत व कारागीरांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे. पाच वर्षा नंतर दरवाढ करत आहोत.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT