पुणे

खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिली...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात 12 टक्‍क्‍यांवरून 17 टक्‍के करण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी (ता. 4) घेतला. नव्याने स्थापित झालेल्या राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही नववर्षाची भेट मानली जात आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह अन्य पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याची मागणी केली जात होती. त्यावर राज्य सरकारने एक जुलै 2019 पासून सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 12 टक्‍क्‍यांवरून 17 टक्‍के करण्यात यावा.

तसेच, महागाई भत्ता वाढीची रक्‍कम एक डिसेंबर 2019 पासून रोखीने देण्यात यावी. एक जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत पाच महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येतील, असे अध्यादेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT