पुणे

मंगळवेढ्यात 4777 कुटुंबाचा धान्य पुरवठा बंद

CD

प्रतीक्षा यादीतील गरजूंना रेशनचा लाभ द्या!
मंगळवेढ्यातील मागणी; अपात्र लाभार्थ्यांच्या जागी गरीब कुटुंबांचा समावेश करण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २५ : आयकर भरणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा धान्यपुरवठा बंद करणे योग्य असले, तरी त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील गरीब कुटुंबांना तातडीने धान्याचा लाभ द्यावा. तसेच, आयकर न भरणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर राणे यांनी केली आहे. तालुक्यातील ४,७७७ शिधापत्रिकाधारकांचा धान्यपुरवठा ‘मिशन सुधार’अंतर्गत बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.
------------------------
पुरवठा विभागाच्या या कारवाईत आयकरदात्यांसह ‘सायलेंट बेनिफिशरी’ या वर्गवारीतील काही लाभार्थ्यांचाही समावेश आहे. त्यातील काहींनी आधार अद्ययावत करून केवायसी पूर्ण केली आहे. अशा लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा पूर्ववत होऊ शकतो. मात्र, नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्याबाबत वरिष्ठांकडून अद्याप सूचना आलेल्या नाहीत.
- नवनाथ चव्हाण, पुरवठा निरीक्षक
------------------------
सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला जाईल.
- शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष, भाजप

चौकट
गावनिहाय धान्यपुरवठा बंद झालेल्या शिधापत्रिकांची संख्या
अवताडेवाडी २२, अकोले २७, आंधळगाव १२२, अरळी २३, आसबेवाडी ४०, बठाण ४४, बावची २५, भालेवाडी १५, भाळवणी ९९, भोसे २०२, बोराळे १०६, ब्रह्मपुरी ८१, चिकलगी ३५, देगाव २१, धर्मगाव १५, ढवळस २६, डिकसळ ४१, डोणज ८०, डोंगरगाव ५२, फटेवाडी ७६, गणेशवाडी ४७, घरनिकी २८, गोणेवाडी ६१, गुंजेगाव ७५, हाजापूर ४२, हिवरगाव २८, हुलजंती १३७, हुन्नूर ५७, जालिहाळ ३३, जंगलगी २३, जित्ती ७, जुनोनी ४६, कचरेवाडी १६४, कात्राळ ३२, खडकी ३३, खवे ४९, खोमनाळ ४६, खुपसंगी १५२, लमाणतांडा १५२, लवंगी ३९, लक्ष्मी दहिवडी १५३, लेंडवेचिंचाळे ३८, लोणार २२, माचणूर ८०, ममदाबाद हुन्नूर ७३, महमदाबाद शे. ७, माळेवाडी १८, मलेवाडी २९, मानेवाडी ४३, मंगळवेढा शहर ४५२, मारापूर ८२, मरवडे १००, मारोळी २९, मेटकरवाडी ३४, मुढवी ४४, मुंडेवाडी ३२, नागणेवाडी ३०, नंदेश्वर १४८, नंदूर ८०, निंबोणी ६५, पडोळकरवाडी ३७, पाटकळ ८२, पौट ३६, रड्डे ९४, रहाटेवाडी १९, रेवेवाडी ५५, सलगर बुद्रूक ११८, सलगर खुर्द ३१, शेलेवाडी ४६, शिरशी ३१, शिरनांदगी ३३, शिवनगी ३९, सिद्धापूर १९, सिद्धनकेरी ३, सोड्डी ६०, तळसंगी ८२, तामदर्डी २०, तांडोर १५, उचेठाण ३६, येड्राव ५२, येळगी २७.
एकूण : ४,७७७ शिधापत्रिकाधारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

SCROLL FOR NEXT