ration-card 
पुणे

ऐकलंत का, रेशन कार्ड मिळतेय खासगी केंद्रात!; हेल्पलाइनमुळे गैरप्रकार उघड

सकाळवृत्तसेवा

पुणे - ऑनलाइन रेशन कार्ड तहसील कार्यालयातून दिले जाते. मात्र, चक्‍क नाशिक येथील एका खासगी केंद्रातून रेशन कार्ड दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. रेशनिंग कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणला असून, त्याची पाळेमुळे राज्यात पसरल्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. 

रेशनिंग कृती समितीचे कार्यकर्ते गोरख आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार, निफाड तालुक्‍यातील अरुण सांगळे यांना रेशन कार्ड तयार करावयाचे होते. त्यासाठी त्यांनी तेथील तहसील कार्यालयात संपर्क साधला; परंतु त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी कार्ड मिळेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे ते एका खासगी केंद्रात गेले. तेथून त्यांना कार्ड देण्यात आले. 

महत्त्वाचे म्हणजे लॉग इन, पासवर्ड वापरण्याचा अधिकार तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आहे. महा-ई-सेवा केंद्रांनाही तो दिला जात नाही. मग खासगी केंद्रातून रेशन कार्ड कसे तयार झाले, हा प्रश्‍न आहे. रेशनिंग कृती समिती आणि झटका डॉट ऑर्ग यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या हेल्पलाइनकडे हे प्रकरण आले. त्यावेळी ही माहिती समोर आली. 

या संदर्भात आव्हाड यांनी नाशिक येथील पुरवठा विभाग आणि निफाडच्या तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. "तहसील कार्यालयातून रेशन कार्ड दिले जाते. गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित केंद्रचालकावर कारवाई करण्यात येईल,' असे त्यांना सांगण्यात आले; परंतु हे केंद्र अद्याप सुरूच आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, पुणे जिल्ह्यात असा कोणताही प्रकार समोर आलेला नाही, असे पुण्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी सांगितले. 

हेल्पलाइनद्वारे नागरिकांना रेशनिंगबाबतच्या अडचणी सोडविण्यास मदत होत आहे. नागरिकांच्या समस्यांमुळे रेशनिंग व्यवस्थेमधील ढिसाळ कारभार समोर आला. सध्या केशरी कार्डधारकांना जुलै, ऑगस्ट महिन्याचे धान्य न मिळाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 
- मयूरी धुमाळ, झटका डॉट ऑर्ग 
 

हेल्पलाइन क्रमांक -  18001024103 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT