ramdas athvale sakal
पुणे

रत्नाकर मखरे आंबेडकरी चळवळीतील लढवैय्या नेते- आठवले

मखरे यांचा योगदान अनमोल असल्याचं मत केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.

डाॅ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे हे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू लढवैय्या नेते व कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीत पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांचे योगदान अनमोल आहे. असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आठवले यांनी इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टमध्ये दिवंगत पॅंथर रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अॅड. राहुल मखरे, आयु. शकुंतला मखरे व कुटुंबीयांशी संवाद साधत दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला त्यांनी उजाळा दिला.

यावेळी आरपीआय तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे यांनी अॅड.राहुल मखरे कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाचे कामकाज पाहत असून बहुजन समाजाच्या वतीने आपली बाजू मांडत असल्याचे नामदार आठवले यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी अॅड. मखरे यांच्याकडून कोरेगाव-भिमा संदर्भात सुरु असलेल्या चौकशी आयोगाच्या कामकाजाबद्दल माहिती जाणून घेतली. नंतर भिमाई आश्रमशाळेची पाहणी करून आठवले यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी संतोष मखरे, अॅड. समीर मखरे, तहसिलदार श्रीकांत पाटील, भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हा संघटन सचिव शिवाजी मखरे, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT