mur.jpg 
पुणे

...अन् त्यांनी सतरा वर्षानंतर केली दहावीची परिक्षा पास

हरीश शर्मा

खडकी बाजार : येथील खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर रात्रप्रशालेचा यंदाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून रत्नमाला मुरकुटे या 77.60 टक्के गुण मिळवून शाळेल अव्वल ठरल्या आहेत. खडकी शिक्षण संस्थेचे संचालक व शिक्षक व खडकीकरांनी रत्नमाला यांचे कौतुक केले आहे.

रत्नमाला राजू मुरकुटे यांनी लग्नाच्या 17 वर्षानंतरही शिकण्याची जिद्द व चिकाटी ठेवत हे य़श मिळविले. खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर रात्रप्रशालेत प्रवेश घेऊन जिद्दीने अभ्यास करून हे यश त्यांनी संपादन केले आहे.

सकाळशी बोलताना रत्नमाला मुरकुटे म्हणाल्या की मला शिक्षणासाठी माझ्या पतीने व मुलांनी पूर्ण सहकार्य करत मला प्रोत्साहन दिले. शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षकांनी माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले व मला मदत ही केली. घरातील सर्व कामे उरकून रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत मी शाळेत जात होते. इयत्ता 9 पास होऊन मी  2002 साली प्रेमविवाह केला. त्यानंतर 17 वर्षाने मला माझ्या पतीने सांगितले की त्यावेळी माझ्यामुळे तुझे शिक्षण अपूर्ण राहिले आता तू ते पूर्ण कर. त्यामुळे मला पुढे डी एड करण्याची इच्छा आहे व पुढे शिक्षिका होण्याचे स्वप्न आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

Thane: ठाकरे गटाच्या बैठकीत मोठा गोंधळ! शाखेत अचानक ६० ते ७० जणांचा प्रवेश, शाखाप्रमुखांवर जोरदार हल्ला; नेमकं काय घडलं?

Shashikant Shinde Jayant Patil : जयंत पाटील आणि शशिकांत शिंदेंमध्ये दुरावा?, शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं; कोल्हापुरातून पक्षाची बांधणी करणार

"पॉकेटमनीसाठी बाप पाहिजे आदर करण्यासाठी नको" सावत्र भावाचे प्रतीक बब्बरवर आरोप; "आता त्यांना बाबा म्हणत नाही"

SCROLL FOR NEXT