राजेगाव, ता. १५ : रावणगाव ३३ केव्ही फिडरसाठी महावितरणने पर्यायी लिंक लाइनचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. यामुळे मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी, लोणारवाडी आणि स्वामी चिंचोली या सहा गावांतील शेतीपंप व गावठाणचा वीजपुरवठा आता अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह होणार आहे.
भिगवण येथील उच्च दाबाच्या भूमिगत केबलमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित होत होता. ही केबल रस्त्याखाली असल्याने दुरुस्तीसाठी मोठा वेळ लागत असे, ज्यामुळे ग्राहकांना अंधारात राहावे लागत होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून महावितरणने ३३ केव्ही मलठण फिडरला जोडणारी पर्यायी लिंक लाइन उभारून ती स्वामी चिंचोली येथे रावणगाव फिडरशी जोडली आहे. आता मुख्य केबलमध्ये बिघाड झाल्यास काही मिनिटांतच पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करता येईल.
हे काम बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता डी. पेठकर, अधीक्षक अभियंता लहामगे, कार्यकारी अभियंता जाधव, उपकार्यकारी अभियंता एस. ननावरे आणि सहायक अभियंता पी. ए. मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. याकामी साईदीप इलेक्ट्रिकलसह तंत्रज्ञ वैभव काळे, प्रवीण ढवळे, नितीन मेंगावडे, एन. एम. गावडे, के. बी. जगताप आणि ए. साळवे यांनी योगदान दिले.
रावणगाव फिडरच्या नवीन लिंक लाइनमुळे भिगवण येथील उच्च दाबाच्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाल्यास मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी, लोणारवाडी आणि स्वामी चिंचोली या गावांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने तातडीने सुरू करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दीर्घकाळ विजेविना राहावे लागणार नाही.
पी. ए. मुंगसे, सहायक अभियंता, महावितरण
या पर्यायी लिंक लाइनमुळे भविष्यातील तांत्रिक बिघाडांचा परिणाम कमी होऊन सहा गावांतील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरक्षित आणि अखंडित राहण्यास मोठी मदत होणार आहे.
- पद्माकर कांबळे, प्रगतशील शेतकरी, रावणगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.