पुणे

रावेतमध्ये डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढले

CD

रावेत, ता. २२ : रावेत आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून डोळे येणे (कंजक्टिवाइटिस) या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. खासगी तसेच सरकारी दवाखान्यांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक उपचारासाठी येत असून, ही साथ स्वरूप धारण करत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
स्थानिक नेत्रतज्ज्ञांच्या मते, हवामानातील बदल, धूळ, प्रदूषण तसेच संसर्गजन्य विषाणू किंवा जिवाणूंमुळे हा आजार वेगाने पसरतो आहे. डोळे लाल होणे, खाज सुटणे, पाणी येणे, जळजळ होणे, सूज येणे, चिकट स्राव होणे आणि प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे, अशी लक्षणे अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहेत.

लहान मुले, वृद्ध अधिक प्रभावित
शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, ‘गेल्या आठवड्यात आमच्याकडे येणाऱ्या डोळे येण्याच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. वेळेवर उपचार न घेतल्यास त्रास वाढू शकतो.’

अशी घ्या काळजी
- डोळ्यांना हात लावणे टाळावे
- वारंवार हात साबणाने धुवावेत
- टॉवेल, रुमाल, उशी किंवा सौंदर्यप्रसाधने इतरांसोबत वापरू नयेत
- डोळे चोळू नयेत
- डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे किंवा ड्रॉप्स वापरू नयेत
- लक्षणे आढळल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी करून घ्यावी

‘‘परिसरात रुग्णसंख्या वाढत आहे. वातावरणातील बदलाचा हा परिणाम असू शकतो. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सूचना देण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. बाळासाहेब होडघर, वरिष्ठ आरोग्य अधिकारी, कुटे हॉस्पिटल, आकुर्डी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha: भाजपचा मोठा गेम! प्रीतम मुंडे, राणा, कराड, दानवेंना कसं केलं बाहेर? राज्यसभेसाठी नवं सोशल इंजिनियरिंग समजून घ्या...

Kaiga Nuclear Power Plant : 'कैगा'मुळे 2,280 मेगावॅट वीज अन् स्थानिकांना हजारो नोकऱ्या! अणुऊर्जेत भारत आता पूर्णपणे 'स्वदेशी'; काय आहे 2047 चा मास्टर प्लॅन?

Latest Marathi News Live Update : भाजपकडून रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

लोकांच्या घरात आश्रय ते गळक्या घरात संसाराची सुरुवात; शेर शिवराज फेम अभिनेत्याने उलगडला स्ट्रगलचा काळ

War Impact on Grape : युद्धाचा द्राक्ष दरावर परिणाम नाही; जिल्ह्यात ३० टक्के शिल्लक, उन्हाळ्यामुळे मागणीत वाढ, रमजानचाही परिणाम

SCROLL FOR NEXT