पुणे

भटक्या श्वानांसाठी अन्नदान आवश्यक

CD

रावेत, ता. ४ : रावेत परिसरात भटक्या श्वानांसाठी अन्नदानाचे प्रमाण वाढले असून, प्राणीप्रेमींनी राबवलेला हा उपक्रम माणुसकीचा प्रतीक मानला जात आहे. मात्र, अन्नदानाच्या ठिकाणी श्वानांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांवर हल्ल्याची भीतीही तितकीच वाढली आहे. त्यामुळे, अन्नदान चांगले आहे, पण नागरिकांच्या जिवाशी खेळू नये, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अनेक सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराजवळ, रस्त्यांच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी अन्न टाकले जात असल्यामुळे त्या भागात श्वानांचा वावर कायमचा वाढला आहे. नागरिकांच्या मते, रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार, पादचारी, शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना श्वानांच्या टोळ्यांमुळे भीती वाटते. काही ठिकाणी श्वानांकडून पाठलाग किंवा चावण्याच्या घटनाही घडल्याचे दावा करण्यात आले आहे.
दुसरीकडे, प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे की भूक लागल्यामुळे श्वान आक्रमक होतात, त्यामुळे अन्नदान आवश्यक आहे. मात्र नागरिकांचा आक्षेप अन्नदानावर नसून, त्याच्या पद्धतीवर आहे. नियोजनाशिवाय अन्न टाकल्यास समस्या वाढू शकतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे काही ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यात श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण, ठरावीक फीडिंग झोन निश्चित करणे आणि अन्नदानाबाबत स्पष्ट नियम लागू करणे यांचा समावेश आहे. तसेच, अन्नदान करताना रहिवासी भागांपासून दूर, सुरक्षित आणि स्वच्छ ठिकाणे निवडावीत, असेही सुचवण्यात आले आहे.

म्हणाले, आम्ही प्राण्यांविरोधात नाही. पण सोसायटीच्या गेटसमोर अन्न टाकल्यामुळे रात्री ये-जा करणे धोकादायक झाले आहे.”
- सचिन पाटील, रहिवासी रावेत

लहान मुलांना खाली खेळायला पाठवताना भीती वाटते. अन्नदान योग्य पद्धतीने आणि सुरक्षित ठिकाणी झाले पाहिजे.
- प्रिया देशमुख, रहिवासी रावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : नेपाळची सार्वत्रिक निवडणूक ५ मार्च रोजी होणार

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT