पुणे

रावेतकरांची साप्ताहिक सुटी वाहतूक कोंडीत

CD

रावेत, ता. १९ : रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली आहे. साप्ताहिक सुटीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीतच अडकून पडावे लागत आहे. अरुंद रस्ता, अतिक्रमणे आणि वाहनांची प्रचंड संख्या यामुळे सतत वाहतूक कोंडी होत असते. त्याचा परिणाम, पुणे-मुंबई महामार्गावरही होत आहे.
या रस्त्यावरुन शेकडो दोनचाकी, चारचाकी आणि शाळेच्या बस दररोज प्रवास करतात. काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागत असून मागून इतर वाहने धडकण्याचे प्रकार घडण्याची शक्यता वाढली आहे. संध्याकाळी ऑफिसच्या वेळात येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. कोंडीतून जावे लागल्याने सायकल व दुचाकीस्वारांना तोल संभाळणे कठीण जाते.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकाई चौक रस्त्यावर काही व्यापाऱ्यांसह इतर चालक रस्त्याच्या कडेला अनियमित वाहने उभी करतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिकच गजबजतो. वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कमी असल्याने शिस्तीचा अभाव जाणवतो. विकास कामांमुळे सतत माती रस्त्यावर साचून धुळीचे प्रमाण प्रचंड वाढते.

भोंडवे चौकातून मुकाई चौकाकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका कायम वाटतो. मुले शाळेत या मार्गावरून जातात. त्यामुळे आम्ही सतत चिंतेत असतो. प्रशासनाने तातडीने वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करावी.
- अनुराधा पाटील, रहिवासी


मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पुलावर ‘बॅटल नेक’ ची स्थिती निर्माण होते. मुकाई चौकात साप्ताहिक सुटीच्या दिवशी अतिरिक्त वाहतूक कोंडी होते. कारण, या दिवशी वाहनांची संख्या वाढते. वाहतूक विभागाच्यावतीने सिग्नल व्यवस्था सुरळीत सुरू आहे. काही कमर्चारी या ठिकाणी नेहमीच तैनात असतात. अरुंद रस्ते व बस डेपो असल्यामुळे देखील कोंडीत भर पडते. यावर लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- भारत शिंदे, पोलिस निरीक्षक (वाहतूक), देहूरोड वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

SCROLL FOR NEXT