Kasba Byelection  esakal
पुणे

Kasba Byelection : रवींद्र धंगेकर उद्या कसबा गणपती मंदिराबाहेर उपोषणाला बसणार

सकाळ डिजिटल टीम

पुणेः कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. मात्र या निवडणुकीत एक नवीन ट्विस्ट समोर येतोय. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे उद्या गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे.

कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचं धंगेकरांचं म्हणणं आहे. त्यामुळेच ते उद्या कसबा गणपती मंदिरासमोर बाहेर उपोषणाला बसणार आहेत.

पोलिसांच्या उपस्थितीत भाजप नेते, पदाधिकारी हे लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला असून ही लोकशाहीची हत्या झाल्याचा ठपका यांनी ठेवलाय. कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मागील काही दिवसांपासून भाजपचे वरिष्ठ नेते कसब्यामध्ये तळ ठोकून आहेत.

खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी रात्री-अपरात्री फिरत आहेत. ऐनकेन प्रकारे भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागल्याचं दिसून आलं. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांनी थेट मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यासाठी ते उद्या उपोषणाला बसणार आहेत.

धंगेकर हे परभवच्या उंबरठ्यावर- भाजप प्रवक्ते खर्डेकर

धंगेकर हे परभवच्या उंबरठ्यावर आहेत आणि त्यांनी केलेला आरोप हा हास्यास्पद आणि निषेधार्य आहेत. पोलिसांचे नाव घेऊन पैसे वाटण्याचा काम सुरू आहे, हे सांगणे म्हणजे सहानभुती मिळवण्याचा प्रकार आहे. त्यांना पराभवाची चाहूल लागली आहे आणि सहानभुती गोळा करण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी उद्या बिनधास्त उपोषणाला बसावे पण कसब्यातील जनता सुज्ञ आहे, असं प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT