पुणे

कर्ज बाजारातील सहभाग वाढविण्यासाठी प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडून नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

CD

कर्ज बाजारातील सहभाग वाढविण्यासाठी प्रस्ताव
रिझर्व्ह बँकेकडून नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
मुंबई, ता. २५ः भारतीय रिझर्व्ह बँकेने मुदतीचे कर्ज बाजार (टर्म मनी मार्केट) विभागातील सहभागाची व्याप्ती आणि तरलता अधिक वाढविण्यासाठी; तसेच सहभागी संस्थांचा, कंपन्यांचा आधार विस्तारण्यासाठी एक प्रस्ताव मांडला आहे. या विभागातील थकीत कर्ज व्यवहारांबाबतच्या मर्यादा या सहभागींनी संचालक मंडळाच्या मंजुरीने निश्चित कराव्यात, असे रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्त्वांच्या नव्या मसुद्यात नमूद केले आहे.

‘‘नियमन असलेल्या संस्थांच्या बाबतीत, या मर्यादा संबंधित संस्थेसाठी रिझर्व्ह बँकेच्या नियमन विभागाने आखून दिलेल्या (एक्सपोजर नॉर्म्स) जोखीम मर्यादांच्या नियामक चौकटीतच असाव्यात,’’ असे या मसुद्यात म्हटले आहे. सक्रिय मुदत कर्ज बाजारामुळे बाजारपेठेतील सहभागींना निधी उभारणीचा एक पर्यायी मार्ग तर मिळतोच, शिवाय ‘ओव्हरनाईट मनी मार्केट’ आणि दीर्घकालीन व्याजदर यांच्यात दुवा निर्माण करून चलनविषयक धोरणाचा प्रभाव पोहोचवण्याची प्रक्रिया (मॉनेटरी पॉलिसी ट्रान्समिशन) सुधारण्यासही मदत होते.
बँकेने सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजार व्यवहारांबाबतच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदाही जारी केला आहे. सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजार व्यवहार हे वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांनुसार केले जातात. स्पष्टता वाढवणे, अनुपालन प्रक्रिया सुलभ करणे आणि सर्व संबंधित घटकांसाठी संदर्भासाठी एकच स्रोत उपलब्ध करून देणे या उद्देशाने, या मसुदा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजार व्यवहारांशी संबंधित सध्याच्या सर्व सूचनांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले. रिझर्व्ह बँकेने या दोन्ही मसुदा परिपत्रकांवर बँका, बाजारपेठेतील सहभागी, गुंतवणूकदार आणि इतर संबंधित घटकांकडून १७ जुलै २०२६ पर्यंत अभिप्राय मागवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT