पुणे

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन "महागात' पडणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळवणे व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या दोन्हीसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 रुपये जादा मोजावे लागणार आहेत. 

परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले किंवा एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांकडून पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले जातात. त्यामध्ये काही जणांचे गुण वाढल्याने फायदाही होतो. पण, बहुतांश जणांच्या शेऱ्यात काहीच फायदा होत नाही. विद्यापीठाने 2009 मध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. पुनर्मूल्यांकन करायचे असेल, तर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेणे बंधनकारक आहे. शुल्कवाढीचा प्रस्ताव परीक्षा व मूल्यमापन मंडळाने व्यवस्थापन परिषदेपुढे मांडला होता. त्यास मंजुरी दिल्यानंतर शुल्कवाढीचे परिपत्रक परीक्षा विभागाकडून काढण्यात आले आहे. त्याबाबतचा आदेश संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. 

छायांकित प्रत पुनर्मूल्यांकन 
अभ्यासक्रम सध्याचे शुल्क सुधारित शुल्क सध्याचे शुल्क सुधारित शुल्क 
अव्यावसायिक 100 150 150 200 
व्यावसायिक 150 200 200 250 

छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाच्या शुल्कात 50 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. 
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT