Re-examination of D class of health recruitment Rajesh Tope pune sakal
पुणे

आरोग्य भरतीच्या ‘ड’ वर्गाची पुन्हा परीक्षा घेणार : राजेश टोपे

आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ वर्गाचा पेपर पूर्ण ‘व्हायरल’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘आरोग्य भरतीबाबत संदर्भात विधानसभा अधिवेशनात पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांचा सविस्तर अंतिम अहवाल अत्यावश्यक आहे. आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ वर्गाचा पेपर पूर्ण ‘व्हायरल’ झाला होता. त्यामुळे ‘ड’ वर्गाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली आहे, त्यांचे मतही लक्षात घेतले आहे. दोन्ही ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ,’’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा पंधरावा वर्धापनदिन आणि सिंबायोसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात टोपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना टोपे यांनी ही माहिती दिली. संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘सिंबायोसिस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, कुलगुरू डॉ. अश्विनीकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

टोपे म्हणाले,‘‘कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी ते प्रमाण कमी आहे. कोरोनाची चौथी लाट असल्याचे सूतोवाच नाही. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे येथे रुग्ण संख्या थोडी वाढली आहे. पण त्यात रुग्ण गंभीर नाही. रुग्ण संख्या वाढलेल्या राज्यातील आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. परंतु त्यातही रुग्ण संख्या वाढली, तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढण्यात आला आहे.’’ पुण्यातील किडनी रॅकेट संदर्भात न्यायालयीन सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘‘सिटी स्कॅन आणि एमआरआय याठिकाणी जाऊन फोटो काढणे ही पद्धत कोठेही पाहिली नाही. अशा पद्धतीने रुग्णालयाला अंधारात ठेवून कोणी दुसऱ्याने फोटो काढले असतील तर ते चुकीचे आहे.’’, असेही स्पष्ट मतही टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.या विद्यापीठातर्फे गृहिणी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त प्रशिक्षण देण्यात येते, असे डॉ. स्वाती मुजूमदार यांनी वर्धापनदिन सोहळ्यात सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT