पुणे

सर्व आवृत्यांसाठी SIILCच्या लोगोसह वापरावी

CD

रियल इस्टेट व्हॅल्युएशन,
गुंतवणूक विश्लेषण कार्यशाळा
मालमत्तेचे अचूक मूल्यांकन आणि फायदेशीर गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी ‘रिअल इस्टेट व्हॅल्युएशन व गुंतवणूक विश्लेषण’ या विषयावरील विशेष प्रात्यक्षिक कार्यशाळा १३ सप्टेंबरला आयोजिली आहे. रियल इस्टेट सल्लागार, प्रॉपर्टी कन्सल्टंट, गुंतवणूकदार, आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर्स, बिल्डर्स तसेच बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेत रियल इस्टेट बाजारातील कल, मालमत्ता मूल्यांकनाच्या आधुनिक पद्धती, परिसर विश्लेषण, भाडे उत्पन्न, गुंतवणुकीवरील परतावा, गुंतवणूक विश्लेषण, महारेरा नियम, जोखीम मूल्यांकन आणि विकासक्षम भागांची ओळख याविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रत्यक्ष उदाहरणे, केस स्टडीज, लाईव्ह मार्केट ॲनालिसिस आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे सहभागी अधिक आत्मविश्वासाने व फायदेशीर रिअल इस्टेट गुंतवणूक निर्णय घेऊ शकतील. संपर्क : ८४८४८२२८५५

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
जागतिकीकरणामुळे भारतीय उत्पादने जगभरातील बाजारपेठेत पोहोचविण्याच्या संधी वाढल्या असून, योग्य नियोजन आणि व्यावसायिक धोरणांच्या आधारे आयात-निर्यात व्यवसाय सुरू करता येतो. या पार्श्वभूमीवर सात दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ प्रशिक्षण १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान सुरू होणार आहे. प्रशिक्षणात आयात-निर्यात धोरण, आवश्यक नोंदणी व परवाने, आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक अटी, शिपिंग व कंटेनर व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, दररचना, पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच परदेशी ग्राहक व पुरवठादार शोधणे, बाजारपेठेचा अभ्यास, उत्पादनाची निवड, आंतरराष्ट्रीय वाटाघाटी, व्यवहारातील जोखीम व्यवस्थापन, कागदपत्रे, पेमेंट पद्धती, बँकिंग, कस्टम्स व शिपिंग प्रक्रिया यांची माहिती दिली जाईल. प्रत्यक्ष उदाहरणे व केस स्टडीजच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना व्यवसायाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली जाणार असून, स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी, उत्पादक आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण विशेष उपयुक्त ठरणार आहे. संपर्क : ८४८४८२२१६६

जमीन गुंतवणूक व्यवसायाबाबत मार्गदर्शन
जमिनीचे भाव हे सर्वत्र आणि सतत वाढत असल्याने म्युच्युअल फंड, इक्विटी शेअर्स यांसारख्या गुंतवणुकी पेक्षा जमिनीतील गुंतवणूक जास्त फायद्याची ठरते. गुंतवणूक पर्याय म्हणून जमिनीकडे कसे बघावे व त्यातून पैसा कसा उभारावा यासंदर्भात मार्गदर्शन करणारी २७ सप्टेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत जमिनीची मूलभूत माहिती : प्रकार, क्षेत्र आणि दस्तऐवजीकरण, स्पर्धक विश्लेषण आणि बाजार संशोधन, जमीन शोधणे व त्याचे नियोजन, बँकिंग आणि वित्त (निधी), विकास आणि विपणन, मालमत्ता व्यवस्थापन आदी विषयांवर रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत नोट्स दिल्या जातील, आणि १०० टक्के व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक उदाहरणांसह माहिती दिली जाईल. संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT