rebel candidates in Shiv Sena parties withdraw nomination in Vadgaon Sheri constituency for Maharashtra Vidhan Sabha 2019 
पुणे

Vidhan Sabha 2019 : वडगावशेरी मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी थंडावली

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पुणे : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी करीत अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे नगरसेवक संजय भोसले यांनी अखेर आपला अर्ज माघारी घेत भाजपच्या जगदीश मुळीक यांची वाट मोकळी केली आहे. याबरोबरच अन्य चार अपक्ष उमेदवारांनीही माघार घेतली आहे. 

उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी सोमवारी अखेरचा दिवस होता. भाजप-शिवसेना महायुती असताना, भाजपचे विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात असतानाही शिवसेनेचे नगरसेवक संजय भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे मुळीक यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन अखेर भोसले यांनी माघार घेतली. 

याबरोबरच बाळभाऊ पोटभरे (हमारी अपनी पार्टी), चंद्रकांत सावंत (अपक्ष), सतीश मुळीक (अपक्ष), अग्रजीतसेन मुळीक (अपक्ष) यांनीही माघार घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यासमवेत 'डमी' अर्ज भरणारे माजी आमदार बापू पठारे यांनीही आपला अर्ज माघारी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT