Police sakal
पुणे

पारगाव स्वतंत्र पोलीसठाण्यास मान्यता

पारगाव येथे नवीन पोलीस ठाण्यास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाने मंजुरी दिली

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पारगाव येथे नवीन पोलीस ठाण्यास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाने मंजुरी दिली असून विविध संवर्गातील नियमित एकुण 55 पदे निर्माण करण्यास चार कोटी 59 लाख 91 हजार 932 रुपये निधीला शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील १८ गावे हि मंचर पोलीस ठाण्यापासून सुमारे २० ये २२ किलोमीटर अंतरावर आहेत.पूर्व भागात लोणी, धामणी, पारगाव हि मोठी गावे आहेत पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्यामुळे परिसर नेहमी गजबजलेला असतो या गावांमध्ये कोणता गुन्हा घडल्यास पोलीस घटनास्थळी पोहचण्यास उशीर लागतो तो पर्यत गुन्हेगार पसार झालेले असतात. या परिसरात चोऱ्यांचे घटना नेहमी घडतात परिसरातील नागरिकांच्या मागणीवरून तीन वर्षापूर्वी लोणी व पारगाव येथे पोलीस चौकी सुरु करण्यात आली परंतु या चौक्यांमध्ये एकच पोलीस नाईक नेमणुकीस असतो तोही फक्त दिवसा असतो काही वेळेस अनेक दिवस या चौक्या उघडल्या जात नाही पारगाव हे ठिकाण आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील व शिरूर तालुक्याच्या पच्छिम भागातील अनेक गावांचे मध्यवर्ती गाव आहे या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावी अशी नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती या बाबत दैनिक सकाळ मध्ये याबाबत वारंवार वृत्त प्रसिध्द झाले होते.

गृहमंत्री श्री वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून जुलै २०२१ मध्ये येथील पोलीस स्टेशनला प्रशासकीय मान्यता मिळाली होती पुणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत मंचर पोलीस स्टेशनचे विभाजन करुन नवीन “पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशन" निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली असून नवनिर्मित “पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशन” करिता सदर शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट अ" मध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील नियमित एकुण 55 पदे निर्माण करण्यास व याअनुषंगाने येणा-या चार कोटी 59 लाख 91 हजार 932रुपये खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तसेच, सदरच्या ५५ पदांपैकी पोलीस नाईक या संवर्गातील 15पदांबाबत भविष्यात धोरणात्मक निर्णय घेतला गेल्यास, त्याप्रमाणे निर्णय लागू राहील. या पोलीस स्टेशन" करिता सदर शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट ब" मध्ये नमूद केल्याप्रमाणे 40 लाख 41हजार 500 रुपये इतक्या अनावर्ती खर्चासहि मान्यता देण्यात आली आहे नवनिर्मित “पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशन” च्या हद्दनिश्चिती बाबतचा प्रस्ताव पोलीसमहासंचालकांनी शासनास तात्काळ सादर करण्यात बाबत सूचना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT