Akash kumbhar 
पुणे

फिटनेस फोटोग्राफर आकाश कुंभारचा विक्रम

बाबा तारे

दहा तासांत २७४ मॉडेल्सची काढली २१६७ छायाचित्रे

पुणे: अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा छायाचित्रकार आकाश कुंभारने १० तासांत २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ छायाचित्रे काढण्याची ‘वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. अशा प्रकारची छायाचित्रे काढणारा आकाश हा पहिलाच भारतीय फिटनेस फोटोग्राफर ठरला आहे.

आकाश हा बाणेरमधील रहिवासी असून मूळचे कुंभार कुटुंब बारामतीचे आहे. आकाशचे वडील चंद्रकांत कुंभार वडगाव मावळ येथे कृषी सहायक पदावर कार्यरत आहे. आकाशने १२ जानेवारीला सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी या विश्वविक्रमास सुरवात केली आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजून ३० मिनिटांत तो पूर्णही केला. यासाठी नुकताच त्याचा वर्ल्ड इंडिया रेकॉर्डसकडून गौरव करण्यात आला. आकाशने आजवर अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाइनर्ससाठी तसेच ग्लॅमर जगतातील, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल्ससाठी पोर्टफोलिओचे छायाचित्रण केलेले आहेत. २०१८ मध्ये एशिया आणि मीडलइस्टच्या ‘वॉव अवॉर्डस’ने आकाशचा ‘आउटस्टॅंडिग फॅशन फोटोग्राफर’ सन्मान गौरव केला गेला आहे. ‘बी’ या आंतरराष्ट्रीय लाइफस्टाइल नियतकालीकाच्या मुखपृष्ठासाठीही तीनदा छायाचित्रण केलेला आकाश फॅशन जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे.

आकाश आपल्या विक्रमाविषयी म्हणतो की, मी २०१२ पासून फिटनेस इंडस्ट्रीत काम करतोय. परंतु, एका दिवसात २७४ मॉडेल्सचे फोटो काढणे हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. तसेच भारतात फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता नसल्याचे मला जाणवले. मला हा विक्रम नोंदवून फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता आणायची आहे. फोटोग्राफीकडे व्यावसायिकदृष्टीने न पाहता, कलात्मक माध्यमातून नव्यापिढीने पाहावे, यासाठी मी हा विक्रम नोंदवला आहे. याचे श्रेय मी माझ्या आई, वडिलांना तसेच माझ्या मित्रांना देऊ इच्छितो. काही दिवसांतच मी यूकेमध्ये जाऊन गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणार आहे.

आकाश हा जगातील पहिला फिटनेस फोटोग्राफऱ असून, त्याचा हा विक्रम वर्ल्ड इंडिया रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला आहे. त्याने अनेक विश्‍वविक्रम करावे ह्यासाठी त्याला आमच्या शुभेच्छा.
- पवन सोलंकी, अध्यक्ष, वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT