fine Sakal
पुणे

26 अडत्यांकडून तीस हजार रुपयांचा दंड वसूल

बाजार समितीची करवाई; ‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम

प्रवीण डोके

पुणे - मार्केट यार्डातील अडते खराब फळे, भाजीपाला गाळ्यासमोरच टाकत होते. यामुळे बाजारात सर्वत्र घणीचे साम्राज्य पसरले होते. याबाबत ‘सकाळ’ने ‘अडत्यांकडून समितीच्या आदेशाला केराची टोपली’ मथळ्या खाली बातमी प्रसिध्दी केली. त्यानंतर बाजार समितीने 26 आडत्यांवर करवाई करत 30,680 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारा ओला कचरा आणि सुका कचऱ्याचा बकेट दर्शनी भागात ठेवणे बंधनकारक आहे. तसेच या भागात स्वच्छ्ता ठेवण्याचे देखील अनिवार्य आहे. बाजार समितीने देखील कचऱ्यासाठी बकेट ठेवण्याचे अनिवार्य केले आहे. परंतु समितीच्या आदेश बाजारातील अडते जुमानत नसल्याचे समोर आले आहे. प्रशासकांचा आदेशाची अंमलबजावणी यापुढे तरी होते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीने मंगळवारी गाळ्यांच्या समोर नासकी फळे, भाज्या, कचरा टाकणाऱ्या 26 आडत्यावर प्रत्येकी 1180 रुपये या प्रमाणे कारवाई करत 30,680 रुपये दंड वसूल केला आहे. तसेच संबंधीतांना कचरा करू नये म्हणून समज दिली आहे. ही कारवाई प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी केली आहे.

बाजारात कचरा होऊ नये म्हणून यापुढे गाळ्यासमोर खराब फळे भाजीपाला टाकणाऱ्यावर सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे. बाजारातील अडत्यांनी नासकी फळे, भाजीपाला गाळ्यासमोर न टाकता कचऱ्याची बकेट ठेवून त्यात टाकावा. यामुळे बाजार स्वच्छ राहण्यास मदत होईल.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT