Recruitment of 801 Vacancies Health Department of pune ZP esakal
पुणे

पुणे झेडपीच्या आरोग्य विभागात ८०१ जागांची भरती

राज्य सरकारची परवानगी; रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने शुक्रवारी (ता.२१) परवानगी दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध संवर्गातील ८५९ पैकी ८०१ रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पदांच्या भरतीसाठी याआधी २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु या जाहिरातीनुसारची सर्व भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. मात्र या जाहिरातीत नमूद केलेल्या विविध पाच संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया नव्याने सुरु केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पातळीवर भरण्याचा आदेश राज्य सरकारने दिला जाणार आहे.

या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेवक (वेगवेगळे दोन संवर्ग), आरोग्यसेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक आदी संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी शुक्रवारी (ता. २१) सांगितले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पदांचे वेगवेगळे १२ संवर्ग आहेत. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्यसेवक (तीन संवर्ग), आरोग्यसेविका, छायाचित्रकार, अवैद्यकीय पर्यवेक्षक, आरोग्य सहायक (पुरुष), आरोग्य सहायक (महिला) आदींचा समावेश आहे. यापैकी केवळ पाच संवर्गातील पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ही पदे भरण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पदांच्या भरतीसाठी आणि जिल्हास्तर जिल्हा निवड समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून आरक्षणनिहाय पदे भरली जाणार आहेत. याबाबतची जाहिरात येत्या महिनाभरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, याआधी सन २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया ही रद्द करण्यात आली आहे.

भरली जाणारी पदे

- आरोग्यसेवक --- २६२

- आरोग्यसेविका --- ५०३

- औषध निर्माता --- २९

- प्रयोगशाळा तंत्रज्ञ --- ०४

- आरोग्य पर्यवेक्षक --- ०३

- एकूण जागा --- ८०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT