Recruitment esakal
पुणे

माजी सैनिकांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कर्मचारी भरती

पुणे शहर व जिल्ह्यातील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहर व जिल्ह्यातील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यातील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी अन्य इच्छुकांनाही अर्ज करता येणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना यासाठी येत्या १५ जून अखेरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

यासाठी इच्छुक असलेल्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. या भरती मोहिमेत पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये सहाय्यक वसतिगृह अधीक्षक ३ (पुरुष), स्वयंपाकी ९ (महिला), सफाई कर्मचारी ३ (पुरुष), माळी १ (पुरुष) आणि नवी पेठ येथील सैनिकी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका ३ (महिला), स्वयंपाकी ७ (महिला), सफाई कर्मचारी २ (पुरुष) आणि माळी १ (महिला) अशी रिक्त पदे भरली जाणार असल्याचे पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) यांनी सांगितले.

या भरतीबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या (०२०) -२६१२२२८७ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल यांच्या ७०२०४१०९५४ या आणि वसतिगृह अधीक्षिका अनिता पाटेकर यांच्या ९४०४५८१९४७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुभाष सासने (निवृत्त) यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : टीएमसीच्या दोन्ही गटांना नवी नावे आणि निवडणूक चिन्हे; ममता बॅनर्जी गटाला फुटबॉल, तर बंडखोर गटाला लिफाफा

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT