Red alert in Pune Municipal Corporation appeals to companies to give work from home to employees  sakal
पुणे

पुण्यात रेड अलर्ट! खाजगी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे आवाहन

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यात पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान विभागाने येत्या ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. पुण्यात उद्यापासून दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने आता पुणे पालिका प्रशासन देखील सज्ज झाली आहे. खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे अवाहन पुणे मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान हवामान विभागाने पावसाच्या इशारा दिला गेल्याने, उद्या पुणे शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुण्यात मोठ्या संख्येने खासगी कपन्यांमध्ये लोक काम करतात. या पार्श्वभूमिवर पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्वच खाजगी कंपन्या आणि आयटी कंपन्यांना देखील त्यांच्या कर्मचारी वर्गाला वर्क फ्रॉम होम देण्याच आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने उद्या आणि परवा पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे, त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.

पुणे शहरात हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना १३ व १४ जुलैपर्यत दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT