Rain rain
पुणे

Pune Rain Update : पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर शहरात मध्यम पाऊस

गुरुवारी (ता. २७) पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट, उर्वरित जिल्ह्यात आणि शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

सम्राट कदम

पुणे - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (ता. २७) पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट, उर्वरित जिल्ह्यात आणि शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बुधवारी सकाळपासूनच शहर आणि जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली होती. सकाळी साडेआठ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार भोर येथे सर्वाधिक १४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर सर्वात कमी शिरूर येथे एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात चिंचवड येथे ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर सरासरी ४ मिलिमीटर पाऊस पडला.

राज्यातही गुरुवारी (ता. २७) कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूरमध्ये अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, रायसेन, मंडला, दुर्ग, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्राच्या मध्य भागातून असलेले पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. पश्‍चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

गुरुवारी रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे. तर उर्वरित कोकण, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

जिल्ह्यातील २४ तासांतील पर्जन्यमान (बुधवारी सकाळी ८ - ३० वा.)

भोर - १४६

लवासा - ६९.५

चिंचवड - २३.०

राजगुरुनगर - १६

नारायणगाव - १३

दौंड - ११

शिवाजीनगर - १०.७

हडपसर - ८

आंबेगाव - ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT