pune  
पुणे

पुण्यात 'रेड ऍलर्ट'; गेल्या 10 दिवसाइतका पाऊस उद्या एकाच दिवशी पडणार (व्हिडिओ)

योगिराज प्रभुणे

पुणे : पुण्यात गेल्या दहा दिवसा पडलेल्या पावसा एवढा पाऊस उद्या (गुरुवारी) एका दिवासात पुणे जिल्ह्यात कोसळण्याची शक्यता असून त्यासाठी हवमान खात्याने आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या दहा दिवसा पुणे शहरात सुमारे 200 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तेवढाच पाऊस उद्या एका दिवासात मुख्यत्वे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर कोसळणार आहे. 

 या बाबत 'सकाळ'ला अधिक माहिती देताना हवामान खात्यातील शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्‍यपी म्हणाले, "बंगालच्या उपसागरात अतितीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. ओरिसा, पश्‍चिम बंगाल या मार्गे तो विदर्भाच्या दिशेने पुढे येत आहे. त्यामुळे पावसाची जोर वाढण्याची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर पुढील दोन दिवसांमध्ये काही भागात पावसाच्या मुसळधार सरी पडतील. तेथे एका दिवसात 20.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद होईल. त्यामुळे या भागात "रेड ऍलर्ट' देण्यात आला आहे.'' 

का वाढणार पाऊस? 
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची (मॉन्सून) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर अशा दोन्हीही शाखाही सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. त्याच वेळी पश्‍चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढत आहे. त्याचा थेट परिणाम मध्य महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे या भागात पाऊस वाढत आहे. दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याच्या परिणामामुळेही पुण्यात पाऊस पुन्हा वाढणार आहे. तसेच, मॉन्सून ट्रफ दक्षिणेकडे सरकला आहे. हवामान घटकाच्या विश्‍लेषणावरून बुधवारी संध्याकाळपासून ते शुक्रवारी (ता. 9) दुपारपर्यंत पुणे आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, डॉ. कश्‍यपी यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

असा पडणार पाऊस 
8 ऑगस्ट : मुसळधार पावसाची शक्‍यता 
9 ऑगस्ट : पावसाचा जोर वाढण्याचा इशारा 
10 ऑगस्ट : काही भागात जोरदार पाऊस पडेल 
11 ऑगस्ट : मध्यम ते हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची धावपळ; १५ जुलैपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कसरत, अपूर्ण कामांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

Tilari Forest women killing Case : घटस्फोटीत महिलेसोबत संबंध, लग्नाचं अमिष दाखवून तिलारी जंगलात नेत केला खून; पितापुत्राचा रक्तरंजित थरार

Petrol-Diesel Price Today: कच्चे तेल 90 डॉलरखाली घसरले! पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Comedian Pranit More Show : मृतदेहाच्या खासगी अवयवावरून अश्लील विनोद; कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील KEM च्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ पाहून युजर्स भडकले!

Indian Railways Innovation : भारताची रेल्वेमध्ये नवी क्रांती; जगात पहिल्यांदाच इलेक्ट्रीक डबल-स्टॅक कंटेनर रेल्वे धावली, अमेरिका, चीनलाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT