Slum 
पुणे

पुण्यातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास १०० कोटी रुपयांत

सकाळवृत्तसेवा

स्वमालकीच्या जागेवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी "आरसीबी''(रिझर्व्हेशन क्रेडिट बॉण्ड) पर्यायाचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. तसे झाल्यास झोपडपट्ट्यांच्या विकास गतीने होण्यासाठी विकसक पुढे येण्याची शक्‍यता आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

झोपडपट्यांमध्ये कोरोना झपाट्याने वाढतो आहे. अरुंद रस्ते, दाटवस्ती, सार्वजनिक स्वच्छतागृहांचे प्रश्न  या पार्श्‍वभूमीवर झोपडपट्टांचा विकास गतीने कशा पद्धतीने होईल, याचा विचार युद्धपातळीवर सुरू झाला आहे. त्यातूनच महापालिकेने स्वमालकीच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचा विकास स्वखर्चातून करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील २२ झोपडपट्ट्या या महापालिकेच्या मालकीच्या जागेवर उभ्या आहेत.दरवर्षी सोयी-सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. गेली अनेक वर्ष हा खर्च सुरू आहे. त्याऐवजी या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

त्यासाठी किमान ७५  ते १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेता हा खर्च करणे महापालिकेला शक्‍य नाही. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यायांवर विचार सुरू आहे. त्यामध्ये आरसीबी बॉण्डचा एक पर्याय पुढे आला आहे. महापालिकेच्या बांधकाम नियमावलीत देखील आरसीबी बॉण्ड देण्याची तरतूद आहे. त्यास राज्य सरकारची देखील मान्यता आहे. 

यासंदर्भात आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास गतीने करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. त्यामध्ये आरसीबीचा विचार आम्ही करीत आहोत. हा एक उत्तम पर्याय असू शकतो.’’

४४८ - पुणे शहरातील झोपडपट्ट्यांची एकूण संख्या
२२ - पालिकेच्या मालकीच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या
७५/१०० कोटी रु. पुनर्विकास करण्यासाठी अपेक्षित खर्च 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT