पुणे, ता. २ : अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती, आरोग्यसेवा, कृषी, वाहतूक व पुरवठा साखळी क्षेत्रातील शीतसाखळीचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी ‘रेफकॉल्ड इंडिया २०२६’ या आंतरराष्ट्रीय शीतकरण व शीतसाखळी प्रदर्शनाचे (रेफ्रिजरेशन व कोल्ड चेन) आयोजन १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे हे नववे वर्ष असून शीतकरण व शीतसाखळी आणि संबंधित उद्योगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण येथे होणार आहे, अशी माहिती ‘रेफकॉल्ड इंडिया २०२६’चे अध्यक्ष अरविंद सुरंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स (ईशराइ)तर्फे आयोजित हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून नवउद्यमींसाठी (स्टार्टअप्ससाठी) विविध संधी उपलब्ध करून देणारे आहे. प्रदर्शनात देश-विदेशांतील व्यावसायिक, उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार, कंत्राटदार, धोरणकर्ते आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात ३०० हून अधिक विक्री केंद्रांमध्ये (स्टॉल्समध्ये) स्मार्ट, शाश्वत आणि ऊर्जा-कार्यक्षम उत्पादने व तंत्रज्ञान यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच तज्ज्ञांची व्याख्याने, ज्ञानसत्रे, ‘रेफकॉल्ड अवॉर्ड्स’, प्रात्यक्षिक विभाग आणि आंतरराष्ट्रीय पोस्टर स्पर्धा ही प्रमुख आकर्षणे असतील. या प्रदर्शनातून उद्योगाला नवीन तंत्रज्ञान, व्यवसायाच्या संधी आणि सहकार्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनाला २० हजारांहून अधिक अभ्यागत येणार आहेत. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी www.refcold.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन सुरंगे यांनी केले. पत्रकार परिषदेस पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सुभाष खनाडे, दीपक वाणी, नंदकिशोर कोतकर, आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.