registration and stamp duty work is closed hadapsar 
पुणे

रजिस्टार नसल्याने दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प; शासनाचा महसूल बुडतोय

सकाळवृत्तसेवा

पुणे : हडपसर येथील दुय्यम निंबधक कार्यालय हवेली क्र. 3 मध्ये सबरजिस्ट्रार गेल्या आठ दिवसांपासून गैरहजर आहे. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच शासनाचा महसुल देखील बुडत आहे. मेगासेंटर येथील वकिलांनी ही बाब वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र केवळ त्यांना अश्वासने दिली जात आहेत.

नागरिक संजय कांबळे म्हणाले, ''मी नवीन सदनिका घेतली आहे. त्याची नोंदणी करण्यासाठी मी गेल्या चार दिवसांपासून हवेली क्र. 3 दुय्यम निबंधक कार्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र नोंदणी रजिस्टार गैरहजर असल्याने उदया या असे कार्यालयातील कर्मचा-यांकडून सांगण्यात येत आहे.''

याबाबत अॅड. दिलीप जगताप म्हणाले, ''दस्तनोंदणी करण्यासाठी मांजरी, मुंढवा, शेवाळेवाडी, फुरसुंगी, वडकीगांव, उरुळी देवाचीसह बारा वाड्यासह हडपसर उपनगरतून नागरीक व वकील दस्तनोंदणी दुय्यम निंबधक कार्यालयात येतात. दररोज या सबरजिस्टर कार्याल्यात सुमारे शंभर दस्त नोंदणी केली जाते. माञ सहाय्यक निबंधक रजिस्टार गैरहजर असल्याने दस्तनोंदणीचे काम गेल्या सात दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शासनाचा महसुल बुडत आहे. तसेच नागरिकांना देखील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. तातडीने याठिकाणी सबरजिस्टार नियुक्त करावा. या बाबत आम्ही वकिलांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली आहे. मात्र कोणतीही कार्यावाही होत नाही.

याबाबत जिल्हा निबंधक अनिल पाखरे म्हणाले, हवेली क्र. 3 ची जबाबदारी दिलेली व्यक्ती वैदयकीय रजेवर गेली आहे. तसेच सध्या जिल्हयात अधिकारीच शिल्लक नाहीत. वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून अन्य जिल्हयातून अधिकारी मिॆळण्याबाबत मागणी केली आहे. येत्या दोन तिन दिवसात हे अधिकारी उपल्बध होतील.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT