नोंदणी-मुद्रांक विभागातील
२८ पदांचा अतिरिक्त कार्यभार
पुण्यातील १५ अधिकाऱ्यांचा समावेश; महसूल विभागाचा शासन आदेश जारी
संदीप नवले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागातील सह जिल्हा निबंधक वर्ग-१, सहायक नोंदणी महानिरीक्षक आणि समकक्ष पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने राज्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील २८ अधिकाऱ्यांकडे या पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याबाबत महसूल विभागाने ८ ऑक्टोबर रोजी शासन आदेश जारी केला आहे.
पुणे जिल्ह्यातील १५ अधिकाऱ्यांकडे विविध पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. यामध्ये नामदेव टिळेकर, स्वप्नील मोरे, रामहरी भोसले, संगीता राजापूरकर, पल्लवी सोळंके घाडगे, वनश्री लाभशेटवार, सुरेखा माने, अमिता तळेकर, मनोज खैरनार, चारुशिला देशमुख मोहिते, मिनल कळसकर, गुरनिंगप्पा बिराजदार, नीलप्रसाद चव्हाण, सचिन पाटील आणि विठ्ठल उदमले यांचा समावेश आहे. यापैकी टिळेकर, मोरे, भोसले, राजापूरकर, सोळंके घाडगे, लाभशेटवार, माने, तळेकर, खैरनार, देशमुख मोहिते, कळसकर आणि बिराजदार यांच्याकडे सहायक नोंदणी महानिरीक्षकांच्या विविध कार्यालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. चव्हाण यांच्याकडे शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय, सचिन पाटील यांच्याकडे पुणे शहर, तर विठ्ठल उदमले यांच्याकडे पुणे उपनगर येथील सह जिल्हा निबंधक वर्ग-१ पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात शशिकांत गायकवाड यांच्याकडे ठाणे शहर, तर वरुणकुमार सहारे यांच्याकडे ठाणे ग्रामीण येथील सह जिल्हा निबंधक वर्ग-१ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई शहरासाठी राजेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर जिल्ह्यांतील नियुक्त्या :
सातारा जिल्ह्यात अभिषेक देशमुख, कोल्हापूरमध्ये शक्ती कदम, नागपूर ग्रामीणमध्ये अजित पाटील, गडचिरोलीमध्ये स्मिता बेलपत्रे, गोंदियामध्ये चंद्रभान खंडाईत, भंडाऱ्यात महादेव जोरवर, अमरावतीमध्ये प्रसेनजित चव्हाण, यवतमाळमध्ये सुनील भुताळे, छत्रपती संभाजीनगरमध्ये रुपेश सिंगारे आणि धाराशिवमध्ये विद्याचरण कडवकर यांच्याकडे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या मूळ पदाचे कामकाज पूर्णवेळ सांभाळून अतिरिक्त पदाची जबाबदारी पार पाडायची आहे. संबंधित पदावर पूर्णवेळ अधिकारी रुजू झाल्यानंतर अतिरिक्त कार्यभार आपोआप संपुष्टात येईल, असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.