पुणे

सोलापूर- अतिवृष्टीने बाधित विहिरींच्या दुरुस्तीसाठी ८४.३० लाखांचा निधी वितरित

CD

अतिवृष्टीबाधित विहिरींच्या दुरुस्तीसाठी ८४.३० लाखांचा निधी
--
५९४ शेतकऱ्यांना दुसरा हप्ता; ३२ जणांची उपयोगिता प्रमाणपत्रे प्रलंबित
--

ॲग्रोवन वृत्तसेवा

सोलापूर : ऑक्टोबर २०२५ मधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी जिल्ह्यातील ५९४ पात्र लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी ८४ लाख ३० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित ३२ लाभार्थ्यांची उपयोगिता प्रमाणपत्रे अद्याप प्रलंबित आहेत.

अतिवृष्टी आणि महापुरामुळे बुजलेल्या तसेच खचलेल्या विहिरींचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्यांच्या आधारे जिल्ह्यातील ६२६ विहिरींच्या दुरुस्तीसाठी एकूण १ कोटी ८७ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रत्येक पात्र लाभार्थ्याला विहीर दुरुस्तीसाठी एकूण ३० हजार रुपयांची मदत दोन टप्प्यांत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. त्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करून उपयोगिता प्रमाणपत्र सादर केलेल्या लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील ६२६ लाभार्थ्यांपैकी ५९४ जणांनी उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या हप्त्याचा ८४ लाख ३० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. उर्वरित ३२ लाभार्थ्यांनी अद्याप प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पात्रतेनुसार पुढील निधी वितरणाची कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

--
प्रतिक्रिया

‘‘जिल्ह्यातील ६२६ विहिरींसाठी १ कोटी ८७ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. ज्या विहिरींचे काम पूर्ण झाले आहे, त्यांच्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रत्येकी १५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तो तातडीने वितरित करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’’

- सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT