रेहान वद्रा यांचा
अविवासोबत वाङनिश्चय
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३० ः काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचा मुलगा रेहान याचा दिल्लीच्या अविवा बेग हिच्यासोबत वाङनिश्चय ठरला आहे. राजस्थानच्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यान परिसरात नववर्षाच्या स्वागतासोबत येत्या दोन-तीन दिवसात रेहान-अविवा यांचा वाङनिश्चयाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधींसह गांधी-वद्रा कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील.
प्रियांका गांधी आणि व्यावसायिक रॉबर्ट वाद्रा यांचा मुलगा रेहान हा व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. अविवा बेग दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये शिकलेल्या आणि ओ.पी.जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी जनसंवाद आणि पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. त्यांचे वडील इम्रान बेग एक व्यावसायिक असून त्यांची आई नंदिता बेग या इंटेरियर डेकोरेटर आहेत.