Reinstall statue of Chhatrapati shivaji maharaj in America Request Prime Minister Union Home Minister Chief Minister and MP investigate theft Sakal
पुणे

Shiv Jayanti 2023 : अमेरिकेत पुन्हा छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवा

चोरीचा तपासासाठी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री व खासदारांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : अमेरिकेच्या सॅन जोस सिलिकॉन व्हॅली शहरातील चोरीस गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचा तपास पुर्ववत करुन पुतळा पुनर्स्थापना करण्याची मागणी पुण्याचे माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी केली आहे.

याबाबत बराटे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे हि मागणी केली आहे. सिस्टर सिटी प्रकल्पांतर्गत सन २००३-०४ साली येथील पुणे महानगरपालिका व मराठी मंडळ यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुर्णाकृती पुतळा स्थापन केला होता. पुतळयाचा अनावरण समारंभास उपमहापौर असताना झाला होता. मी स्वतः या समारंभास उपस्थित होतो.

अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा स्थापित झाल्यामुळे महाराष्ट्र आणि देशासाठी गौरवाची बाब झाली होती. येथे मराठी मंडळानी सॅन जोस महापालिकेकडुन पुतळा बसविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा पुतळा चोरीला गेला आहे. अशी बातमी प्रसिध्द होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे.

देशाच्या अस्तित्वतेवर आघात करण्याचा प्रकार आहे. या चोरीचा छडा लावा. पुन्हा पुतळा प्रस्थापित करा. यासाठी देश पातळीवरुन पुतळा चोरीच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, यासाठी आपल्या देशातील व अमेरिकेतील सरकारी यंत्रणेचा वापर करण्यात यावा.

अमेरिका : सॅन जोस सिलिकॉन व्हॅलीमध्ये २००३-०४ मध्ये सिस्टर सिटी प्रकल्पांतर्गत पुणे महानगरपालिका व मराठी मंडळ यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुर्णाकृती पुतळा स्थापन केला त्यावेळी घेतलेले छायाचित्र पुण्याच्या तत्कालीन महापौर, दीप्ती चवधरी, उपमहापौर दिलीप बराटे, विरोधी पक्ष नेत्या राजलक्ष्मी भोसले आणि मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT