Katraj cemetery 
पुणे

कात्रज स्माशानभूमीत होतेय मृतांच्या नातेवाईकांची वारेमाप लूट!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढत आहे. दरम्यान, अशा कोरोनाबाधित मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करताना  कात्रज स्माशानभूमीत नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे.  

कात्रज स्माशानभूमीत विद्युतदाहिनीची सोय असताना कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी विद्युतदाहिनीला प्राधान्य न देता पारंपारिक पद्धतीने लाकडांचा वापर केला जात आहे. नागरिकांना विद्युतदाहिनीपासून रोखण्यासाठी ही गोष्ट शास्त्रात चालत नाही, विद्युतवाहिनीवर अंत्यविधी केल्यास मोक्ष-शांती मिळणार नाही, अशा भूलथापा नागरिकांना दिल्या जात आहेत. बऱ्याचवेळा विद्युतदाहिनीकडे नेण्यात येणाऱ्या मृतदेहांना लाकडांवर अंत्यविधीसाठी परावृत्त केलं जातंय. त्यानंतर यासाठी लागणाऱ्या वस्तू अव्वाच्या सव्वा किंमतीत विकून मृतांच्या नातेवाईकांची लूट केली जात आहे.  

व्यावसायिकांनी अडवली स्माशानभूमीची जागा  

एका दिवसात विद्युतदाहिनीवर सुमारे १५ मृतदेहांची विल्हेवाट लावली जाऊ शकते. पण लाकूडवाल्यांच्या सेटिंगमुळे विद्युतदहीनीकडे मृतदेह जाऊ दिले जात नाहीत. साधारणतः दिवसाला येणाऱ्या १० ते १२ मृतदेहांपैकी ६ ते ७ मृतदेह विद्युतदाहिनीवर तर ४ ते ५ जाणीवपूर्वक पारंपारिक पद्धतीने लाकडांवर जाळले जातात. यासाठी नागरिकांना ८ ते १० हजारांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्याचबरोबर काही लोकांनी अंत्यविधीच्या साहित्य विक्रीसाठी स्माशानभूमीची जागा अडवून ठेवली आहे, जी मृतांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी ठेवण्यात आली आहे. या जागेत बांबू, गौऱ्या, लाकडं आदी साहित्य ठेवण्यात आलं असून याद्वारे स्माशानभूमीतील मोठ्या जागेवर काब्जा करण्यात आला आहे.

प्रशासनातील अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव? 

विद्युतदाहिनीवर मोफत अंत्यसंस्कार होत असताना एका अंत्यविधीसाठी ८ ते १० हजार रुपयांचा भुर्दंड नातेवाईकांना सोसावा लागणं ही मोठी लूटच आहे.  "कोरोनाच्या मृतदेहांना प्राधान्याने विद्युतदाहिनीवर घ्यायला हवं मात्र इथं तसं होताना दिसत नाही. प्रशासनाने हे थांबवायला हवं अन्यथा आक्रमक भूमिका घेतली जाईल," असा इशारा शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी दिला आहे. तर "स्माशानभूमीत गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा प्रकार सुरु असून आम्ही अनेकवेळा कारवाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यामध्ये राजकीय हस्तक्षेप आडवा येतो, अशावेळी आमच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो," असं पुणे महापालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक मंगलदास माने यांनी सांगितलं. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, राज्यपाल रात्री अचानक गेले राज्याबाहेर; काँग्रेससमोर पेच?

Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT