पुणे

"रेमडेसिव्हिर'साठी पुण्याकडे कूच; बाहेरगावाहून मागणी वाढली

योगिराज प्रभुणे

पुणे - रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन विकत घेण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमधून पंचवीस गाड्या बुधवारी रात्री पुण्यात दाखल झाल्या. या इंजेक्‍शन विकत घेण्यासाठी दिवस-रात्र न बघता कोरोना रुग्णाचे नातेवाइक पुण्यातील वेगवेगळ्या औषध वितरकांच्या दुकानांवर धडका मारत आहेत. 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन डॉक्‍टर लिहून देतात. पुण्यासह राज्याच्या बहुतांश शहरांमध्ये याचा तुटवडा आहे. त्यामुळे हे इंजेक्‍शन विकत घेण्यासाठी पुण्याच्या आजूबाजूच्या गावांमधून नातेवाइक आतापर्यंत येत होतेच; पण आता जळगाव, औरंगाबाद, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, वाई, संगमनेर, मिरज येथूनही नातेवाइक गाड्या घेऊन पुण्यात दाखल होत आहेत. पुण्यातील एका वितरकाच्या दुकानामध्ये बुधवारी रात्री बाहेर गावाहून हे इंजेक्‍शन घेण्यासाठी आलेल्या नातेवाइकांची गर्दी होती. रेमडेसिव्हिरचा 15 सप्टेंबरपर्यंत पुरवठा व्यवस्थित होता. मागणीप्रमाणे प्रत्येक रुग्णाला इंजेक्‍शनचा पुरवठा होत असे. अचानक या इंजेक्‍शनची मागणी वाढल्याने कंपनीकडून होणारा पुरवठा कमी पडत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या इंजेक्‍शनसाठी इतकी धावपळ आतापर्यंत कधीच झाली नव्हती. गेल्या दहा-बारा दिवसांपासून याची मागणी चार पटीने वाढली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून रुग्णांचे नातेवाइक हे इंजेक्‍शन घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. डॉक्‍टर रेड्डी, ज्युबिआर, हेट्रो, सिप्ला या कंपन्या इंजेक्‍शनचे उत्पादन करतात; पण त्यापैकी फक्त हेट्रो कंपनीकडून इंजेक्‍शनचा सर्वाधिक पुरवठा होत आहे. 

ग्रामीण भागातून मागणी वाढली 
आतापर्यंत पुण्या-मुंबईतील डॉक्‍टर हे इंजेक्‍शन लिहून देत होते; पण आता ग्रामीण भागातील डॉक्‍टरही रुग्णांच्या उपचारांसाठी हेच इंजेक्‍शन आणण्याचा सल्ला रुग्णाच्या नातेवाइकांना देत आहेत. त्यामुळे नातेवाइकांची तारांबळ उडत आहे. इतके दिवस टॉसिलिझुमॅब या महागड्या इंजेक्‍शनसाठी नातेवाइक वणवण फिरत होते. आता रेमडेसिव्हिरसाठी पळापळ सुरू आहे, असे निरीक्षण वितरकांनी नोंदविले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT