shiv.jpg
shiv.jpg 
पुणे

गोखलेनगर-जनवाडी प्रतिबंधित क्षेत्र शिथिल करा; शिवसेनेची मागणी

समाधान काटे

गोखलेनगर (पुणे) : गोखलेनगर जनवाडी येथे कोरोना रुग्ण वाढल्याने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुणे मनपाने जाहीर केले आहे. या भागात सुस्पष्टता नसल्याने संपूर्ण भागात ठीक- ठिकाणी पत्रे लावून बंद केला. जुलै महिन्यात पहिल्या पंधरवढ्यातील रुग्ण संख्या १५० आहे तर त्याच्या तुलनेत जुलै महिन्याकाठी पंधारवढ्यातील रुग्ण संख्या ६८ इतकी घटली आहे.

पोलिसांची कडक कारवाई व नागरिकांनी नियम पाळल्याने ही संख्या आटोक्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आज शुक्रवार (ता. ३१) जुलै रोजी शिवसेना शिवाजीनगर संघटक उमेश वाघ यांनी सहआयुक्त घोले रोड क्षेत्रीय अधिकारी किशोरी शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली. मात्र गेली ५ महिने छोटे मोठे व्यावसायिक, रिक्षा चालक,कामगार,घरमालक अतिशय हवालदिल झाले आहेत.

घरांना भाडेकरू नाहीत, मेस व्यवसाय बंद, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून रोजगार बंद,  व्यवसाय नसल्याने दुकानदार भाडे देऊ शकत नाहीत, नागरिक बाहेर पडत नसल्याने रिक्षा चालकांना भाडे मिळत नाही. अशी  दयनीय अवस्था या परिसरातील नागरिकांची झाली आहे.यामुळे उपासमारीची वेळ गोखलेनगर, जनवाडी येथील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. कमी होत असलेली रुग्ण संख्या, नागरिकांची  होणारी उपासमार लक्षात घेऊन, आता हा संपूर्ण भाग प्रतिबंधित क्षेत्र शिथिल करून शासकीय वेळेत नागरिकांना खुला करुन महापालिका व  जिल्हाधिकाऱ्यांना याबद्दल सत्य परिस्थिती माहिती देऊन उपासमारीची वेळ थांबवावी तसेच शिथिल करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी परिसरातील सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्ते,पोलीस, दुकानदार यांची संयुक्त मिटींग घेण्यात यावी अशी देखील मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT