junnar sakal
पुणे

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या परप्रांतीयांची सुटका

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या परप्रांतीय कुटूंबाची जुन्नरमधील तरुणांकडून सुटका करण्यात आली आहे.

दत्ता म्हसकर

जुन्नर : मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या परप्रांतीय कुटूंबाची जुन्नरमधील तरुणांकडून सुटका करण्यात आली आहे. या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जुन्नर शहरातील रविवार पेठ येथील ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिराजवळील मातीच्या जुन्या घराची भिंत शुक्रवारी ता.रोजी रात्री अचानक कोसळली.

मातीच्या ढिगाऱ्या खाली सापडलेले सहा जणांचे कुटुंब परिसरातील तरुणांनी दाखवलेली तत्परता व प्रसंगावधानामुळे वाचले आहे. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती या घटनेने आली आहे. संत कबीरनगर उत्तरप्रदेश येथील सहानी हे परप्रांतीय कुटुंब उदरनिर्वाहासाठी गेल्या पाच-सहा वर्षांपासून येथे राहत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सहानी हे रंगकाम करतात.

कुटुंबातील विनीत सहानी वय- ४०, पत्नी शोभा वय- ३५ वर्ष, व मुले प्रतीक्षा-११ वर्ष, श्रेया-१० वर्ष, श्वेता- ५ वर्ष, व विवेक-१८ महिने असे सहा सदस्य या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भिंत कोसळल्याचा मोठा आवाज होताच जवळच राहणारे अरुण शिंदे, तेजस शिंदे, श्रेयस शिंदे, ऋषिकेश जोगळेकर, अभय पाठक, भागेश गाडेकर, महेश घोडेकर, हर्षवर्धन कुऱ्हे, मंदार ढोबळे, बंडू कर्पे, मिलिंद झगडे,अनिल सावंत आदी युवकांनी मातीच्या ढिगारयाखालून सगळ्यांना सुखरूप बाहेर काढले . तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Update : राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT