reliance 
पुणे

रिलायन्स इन्फ्रा कंपनीकडे ६६ कोटींची थकबाकी

सकाळ वृत्तसेवा

खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरण कामाबाबत चालढकल सुरू असतानाच ‘रिलायन्स इन्फ्रा’ने (पुणे-सातारा टोल रोड कंपनी) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा (एनएचएआय) सुमारे सहा महिन्यांचा एकूण ६६ कोटी रुपयांचा प्रीमियम (सरकारला देण्याचा मोबदला) थकविला आहे.

या परिस्थितीत ‘रिलायन्स इन्फ्रा’वर कारवाई करण्याऐवजी ‘एनएचएआय’ने त्यांना रस्त्याच्या कामासाठी एक महिन्याची मुदत वाढवून दिल्याने ‘एनएचएआय’च ‘रिलायन्स इन्फ्रा’ला पाठीशी घालत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे-सातारा रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण करण्याची मुदत संपून आठ वर्षे उलटली. या आठ वर्षांच्या कालावधीत एकूण पाच वेळा ‘रिलायन्स इन्फ्रा’ला मुदतवाढ देण्यात आली. या रखडलेल्या रुंदीकरणाच्या कामासाठी लोकप्रतिनिधींनी अनेक आंदोलने केली, बैठका झाल्या. मात्र या आंदोलन आणि बैठकांत फक्त काम पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले. असे असताना ‘रिलायन्स इन्फ्रा’ने ‘एनएचएआय’चा गेल्या सहा महिन्यांचा प्रिमियमही थकवला आहे. मात्र, कारवाई करण्याऐवजी ‘एनएचएआय’ने त्यांना रस्त्याच्या कामासाठी एक महिन्याची मुदत वाढवून दिली. त्यामुळे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT