Pune Summer Heat  sakal
पुणे

Pune Summer Heat : रात्रीच्या उकाड्यातून वाऱ्यामुळे सुटका ; पुण्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या खाली

दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री प्रचंड उकाडा, अशी स्थिती पुण्यात गेल्या आठवडाभरात होती. सध्या उन्हाचा चटका कायम असला; तरीही रात्रीच्या प्रचंड उकाड्यातून पुणेकरांची सुटका झाली आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गार वारे वाहत असल्याचा अनुभव पुणेकर घेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री प्रचंड उकाडा, अशी स्थिती पुण्यात गेल्या आठवडाभरात होती. सध्या उन्हाचा चटका कायम असला; तरीही रात्रीच्या प्रचंड उकाड्यातून पुणेकरांची सुटका झाली आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गार वारे वाहत असल्याचा अनुभव पुणेकर घेत आहेत. पुण्यात बुधवारी (ता. ८) कमाल तापमान ३९.३ आणि किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल झालेला नाही. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पहाटे हवेत गारवा होता. त्यामुळे पंख्याशिवाय झोपू न शकणाऱ्या पुणेकरांना आता दिलासा मिळाला आहे. ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक ते दक्षिणअंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे वादळी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.

विदर्भात गारपिटीचा इशारा

विदर्भात गुरुवारी (ता. ९) गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुण्यात पुढील तीन दिवस दुपारनंतर आकाश ढगाळ होण्याची शक्यता असून रविवार (ता. १२) ते मंगळवारपर्यंत (ता. १४) पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४२.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्य उन्हाच्या चटक्याने भाजून निघत होते. विदर्भात कमाल तापमानाचा पारा सातत्याने चाळिशीपार नोंदला जात होता. अशा स्थितीत विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विदर्भात गुरुवारी अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात गारपिटीचा इशारा दिला आहे.

मध्य महाराष्ट्रात चटका कायम

उन्हाच्या चटक्यांनी मध्य महाराष्ट्र अद्यापही होरपळून निघत आहे. पुढील तीन दिवस चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रातील हवामान उपविभागात कोणताही इशारा दिलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Development Package : मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीतील कोटींची उड्डाणे हवेतच! धक्कादायक आकडेवारी समोर

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT