Corona In Pune eSakal
पुणे

पुणे जिल्ह्याला दिलासा; नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण अधिक

दिवसांत साडे अकरा हजार नवे रुग्ण, तर साडे बारा हजार जण कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.२६) सलग दुसऱ्या दिवशी दिवसातील एकूण नवीन कोरोना(CORONA PATIENTS) रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. बुधवारी दिवसांत जिल्ह्यात ११ हजार ३५८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून १२ हजार ३७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात जिल्ह्यातील सात रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी तीन आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ कोरोना मृत्यू आहे. दिवसभरात नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. (pune corona update)

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये( corona update) पुणे शहरातील सर्वाधिक ५ हजार ५२१ नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ३ हजार ४९१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ८३३, नगरपालिका हद्दीत ३७५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३८ नवे रुग्ण सापडले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक ६ हजार ३३३ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील(pimpri chinchwad) ३ हजार ४९४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ८७२, नगरपालिका हद्दीतील ६०० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.(pune corona update)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai CID Raid Kolhapur : मुंबई सीआयडीची कोल्हापुरात मोठी कारवाई अचानक इस्माईल, दस्तगीर या सख्या भावांना उचललं, कोट्यावधींचा घोटाळा...

Pan Card : तुमचा PAN नंबर रँडम नाही! प्रत्येक अक्षरात लपले आहे तुमचं गुपित; जाणून घ्या काय अर्थ आहे

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार श्रेयस तळपदेची एंट्री ? "लोक लक्ष वेधून घेण्यासाठी.."

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची सभा होणार, चार पक्षांनी मागितलेल्या तारखा; अखेर BMCने काढला तोडगा

SCROLL FOR NEXT