Relocated to Haveli Sub Divisional Police Officer Office Gorhe Budruk sakal
पुणे

हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गोऱ्हे बुद्रुक येथे स्थलांतरित

लवकरच होणार उद्घाटन;अधिकाऱ्यांचा अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांना इशारा

निलेश बोरुडे

किरकटवाडी: अखेर हवेली उपविभागीय पोलीस (Haveli Police) अधिकारी कार्यालयाचे गोऱ्हे बुद्रुक (ता.हवेली) येथील नवीन कार्यालयाचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. प्राथमिक कामकाजाला सदर ठिकाणाहून सुरुवात करण्यात आली आहे. गडचिरोली येथून बदलून आलेल्या आणि 'डॅशिंग' अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलीस उपाधिक्षक भाऊसाहेब ढोले यांनी हद्दीतील अवैध व्यावसायिक व गुन्हेगारांना इशारा देत धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अगोदर लोणी काळभोर जवळील कदमवाकवस्ती येथे होते. लोणी काळभोर आणि लोणीकंद या दोन पोलीस ठाण्यांचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात आल्यानंतर येथील कार्यालयातून हवेली उपविभागाचा कारभार पाहणे गैरसोयीचे झाले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी उपविभागीय कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी जागांची चाचपणी करण्यात आल्यानंतर गोऱ्हे बुद्रुक येथे कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर जागा मिळाली. याठिकाणी कार्यालयाचे काम पूर्ण झाले असून पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

दरम्यान पौड, हवेली व वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यावसायिक व गुन्हेगारांना उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी इशारा देत धडक कारवाईला सुरुवात केली आहे. कोणतीही भीती न बाळगता नागरिकांनी संपर्क साधून आपल्या समस्या, तक्रारी मांडाव्यात किंवा घडणाऱ्या गैरप्रकारांची माहिती द्यावी म्हणून आपला संपर्क क्रमांक सार्वजनिक करत नागरिकांना आवाहन केले आहे.

"माहिती मिळेल त्याप्रमाणे अवैध धंदे व गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी निर्भिडपणे संपर्क साधून माहिती द्यावी.8796801181 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर संदेश पाठवावा. माहिती देणारांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. गुन्हेगारी व अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे."

- भाऊसाहेब ढोले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT