रेमडेसिव्हिर ईसकाळ
पुणे

पुण्यात रेमडेसिव्हिर आता खुल्या बाजारात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या मागणीत घट झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचे वितरण आता खुल्या बाजारातून करून देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी याबाबतचे आदेश काढले आहेत. ( Remadesivir in Pune is now open market)

जिल्हाधिकारी यांच्याकडून १९ एप्रिलपासून या इंजेक्‍शनचे वितरण खासगी रुग्णालयांना करण्यात येत होते. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे खासगी रुग्णालयांकडून रोज किती रुग्णांना या इंजेक्‍शनची मागणी याची माहिती मागविण्यात येते. त्यानंतर रुग्णालयांना कोटा निश्‍चित करून वितरकामार्फत ते रुग्णालयांना पुरविण्यात येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच काही रुग्णालयांनी करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा वापर कमी केला. त्यामुळे कोटा ठरवूनही काही रुग्णालये रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन घेण्यास नकार देतात. त्यामुळे प्रशासनाकडे इंजेक्‍शन शिल्लक राहत आहे.

आता या निर्णयानुसार रेमडेसिव्हिर हे इंजेक्‍शन खुल्या बाजारातून रुग्णालयांना मिळणार आहे. ज्या रुग्णालयांना याची गरज भासेल त्यांनी औषध पुरवठा दाराशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

''जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आतापर्यंत एक लाख ७८ हजार ७२४ इंजेक्‍शनचे वितरण करण्यात आले आहे. भविष्यात कोरोनाबाधितांची संख्या आणि या इंजेक्‍शनची मागणी वाढल्यास रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन पुन्हा नियंत्रणात घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.''

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT