पुणे

#PmcIssues पालिकेकडून कामाबाबत वेळकाढूपणा

संतोष धायबर

पुणे - पुणे महानगरपालिकेच्या ऑनलाइन विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची त्या विभागाने तत्काळ दखल घेतली. परंतु, गणेशोत्सवापूर्वी ते काम होणे अपेक्षित असतानाही ते काम अद्यापही ‘जैसे थे’च अवस्थेत आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेकडून कामाचा वेळकाढूपणा दिसून आला.

राज्यभरातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्यामध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. लालमहाल चौकाकडून दगडूशेठ हलवाई गणपतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध असणाऱ्या ड्रेनेजच्या झाकणाला छिद्र पडले आहे. चालताना यामध्ये लहान मुलांचा पाय अडकून दुर्घटनेचा धोका जाणवत होता. त्यामुळे तत्काळ दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या दहा दिवसांमध्ये हे काम झालेच नाही. ड्रेनेजच्या झाकनाचे छायाचित्र १३ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या ट्विटवरवर अपलोड करण्यात आले होते. महानगर विभागाच्या ऑनलाइन विभागाने १४ सप्टेंबर रोजी तक्रारीची दखल घेतली. टोकन क्रमांक ५२७७ असल्याचे कळविलेही. मात्र, अद्यापही ते काम ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोणाला दुखापत झाली अथवा नाही, हे समजू शकले नाही. परंतु, सरकारी कामाचा अनुभव नक्कीच आला. पुणे महानगरपालिका नागरिकांना तक्रारींसाठी ऑनलाइन सेवेचा वापर करण्याचा सल्ला सतत देताना दिसते. यासाठी सोशल मीडियाचाही मोठा वापर केला जातो. प्रत्यक्षात कृती मात्र झाली नसल्याचा अनुभव येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT