पुणे

अतिक्रमणे काढा;पीएमपी सक्षम करा

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रमुख चौक अतिक्रमणमुक्त करा आणि पीएमपी सक्षम करण्यासाठी तातडीने उपायोयजना करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी पत्राद्वारे महापालिका आणि पीएमपीकडे गुरुवारी केली. 

शहरातील प्रमुख रस्त्यांवर सध्या वाहतूक कोंडी होत आहे. त्याबाबत ‘सकाळ’ सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहे. चव्हाण यांनीही त्याची दखल घेतली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की शहरातील प्रमुख चौकांत 

अतिक्रमणे झाली आहेत, ती तातडीने दूर करण्याची गरज आहे. तसेच खड्डे बुजविणे, वाहतूक नियंत्रक दिव्यांना बॅटरी बॅकअप पुरविणे गरजेचे आहे. वारंवार वाहतुकीची कोंडी होत असलेली ठिकाणे निश्‍चित करून तेथे उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

लोकसंख्येच्या प्रमाणात पीएमपीकडे बस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नव्या बस घेण्याची रखडलेली प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. तसेच, आगारांचे विकसन, बसथांबे याबाबतही तातडीने उपाययोजना करा, असे चव्हाण यांनी पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT