Renowned scientist Dr. Shyam Trimbak Tilak dies in Pune.jpg
Renowned scientist Dr. Shyam Trimbak Tilak dies in Pune.jpg 
पुणे

प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. श्याम त्रिंबक टिळक यांचे पुण्यात निधन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रख्यात शास्त्रज्ञ, लेखक व भारतीय वायुजीवशास्त्रज्ञ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्याम त्रिंबक टिळक यांचे शनिवारी(ता.२) वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ टिळक यांनी 'वायुजीवशास्त्र'या नव्याने विकसित वैज्ञानिक शाखेचा आयुष्यभर प्रसार व प्रचार केला. 

१९९० साली औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठातून वनस्पती शास्त्र विभागप्रमुख पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन अविरत संशोधनकार्य त्यांनी केले. १९९५ ते १९९८ या कालावधीमध्ये भारती विद्यापीठात प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. डॉ श्याम टिळक यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.

१९७२ मध्ये टिळक एअर सॅम्पलर या स्वदेशी बनावट यंत्रनिर्मितीसाठी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांच्याहस्ते त्यांना गौरविण्यात आले होते. विविध विद्यापीठामध्ये वायुजीवशास्त्र संशोधन केंद्राची त्यांनी निर्मिती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 80 विद्यार्थ्यांनी पी. एचडी. प्राप्त केली आहे. त्यांची ११ पुस्तके व २५० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. मराठी भाषेत दहा ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.'मागोवा मानवी जीवन शैलीचा' आणि Aerobiology International Edition. ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. 

डॉ टिळक यांच्यावर वैकुंठमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT