Students 
पुणे

कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनो, UGCची नवी नियमावली जाहीर!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : राज्य सरकारने राज्यभरातील महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी पहिल्या टप्प्यात महाविद्यालये सुरू होताना ज्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक आहेत, अशा विज्ञान, तंत्रज्ञान विद्याशाखेचे विद्यार्थी आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवावे. तसेच जे विद्यार्थी कॅंम्पस प्लेसमेंटसाठी पात्र आहेत, त्यांना प्राधान्य द्यावे. उर्वरित अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना टप्प्या टप्प्याने महाविद्यालयात बोलवावे, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिल्या आहेत.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील महाविद्यालयांना टाळे लागलेले असून, अखेर १० महिन्यानंतर महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालये सुरू करताना ५० टक्‍के उपस्थितीच्या निकषावर आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देण्यात आलेल्या नियमानुसार महाविद्यालये सुरू करण्यासाठी शिक्षण संस्थांनी तयारी सुरू केली आहे. लॉकडाऊननंतर महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात ‘यूजीसी’ने नोव्हेंबर महिन्यात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचा विचार करून महाविद्यालये, विद्यापीठांना नियोजन करावे लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व विद्यार्थी किंवा शाखांची महाविद्यालये एकाच वेळेस सुरू करू करून गर्दी करू नये, असे स्पष्ट आदेश ‘यूजीसी’ने दिलेले आहे.

वसतीगृहात रूम शेअरींग बंदीच
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्राधान्य द्या अशा सूचना ‘यूजीसी’ने दिल्या आहेत. या अभ्यासक्रमातील बहुतांश विद्यार्थी दुसऱ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी जात असतात. तेथे राहण्यासाठी महाविद्यालयांचे वसतीगृह वापरतात. पण ‘यूजीसी’ने वसतीगृह सुरू करण्याबाबत पूर्वी प्रमाणे कडक निर्बंध कायम ठेवले आहेत. शिक्षण संस्थांची वसतिगृहे अत्यावश्‍यक असल्यासच सुरू करावीत, पण एका खोलीमध्ये एकच विद्यार्थी राहू शकणार आहे, रूम शेअरिंगला बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविद्यालये व विद्यार्थ्यांची अडचण हो शकते. तसेच प्रकृती स्वास्थ योग्य नसल्यास, त्यांना वसतिगृहात प्रवेश नाही, कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश द्यावा, असेही ‘यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.

यूजीसीच्या महत्त्वाच्या सूचना - 
- विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक किंवा थेट शिक्षणासाठी महाविद्यालयात बोलविताना जास्त विद्यार्थी संख्येचे वर्ग करू नये.
- विद्यार्थ्यांची छोट्या वर्गांमध्ये विभागणी करावी.
- महाविद्यालयात प्रवेश होताना व बाहेर जाताना गर्दी टाळण्याचे नियोजन करावे
- प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्कॅनिंग केले जावे.
- महाविद्यालयाच्या परिसरात थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. - विद्यार्थ्यांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, घरगुती समस्यांमुळे मानसिक दडपण येऊ शकते. त्यासाठी समुपदेशन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी.

- नियमावली पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kolhapur Train : पुणे-कोल्हापूर रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! विशेष दर्जा हटल्याने तिकीट दर घटणार; 'या' तारखेपासून धावणार नव्या क्रमांकाने

Solapur Ration News: मोफत धान्य घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोलापूरमध्ये १.११ लाख रेशनकार्डधारक अपात्र; लाभ कायमचा बंद होणार

Mira-Bhayandar Metro: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या ८ ते ९ गाड्या घटनास्थळी दाखल

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

SCROLL FOR NEXT