पुणे

जाचकवस्ती ते गोतोंडीपर्यंतचा रस्ता झाला खड्डेमुक्त

राजकुमार थोरात

वालचंदनगर : बारामती-इंदापूर राज्यमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून जाचकवस्ती ते गोतोंडीपर्यतच्या रस्ता खड्डेमुक्त झाला असून  दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने प्रवाशांच्या गाड्यांचा वेग वाढला असून छोटे-मोठे अपघात होण्यास सुरवात आहे. अपघात रोखण्यासाठी प्रवाशांनी  वाहनांच्या वेगाला आवर घालण्याची गरज आहे. 

बारामती-इंदापूर हा राज्यमहामार्ग संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग  हाेणार आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. काटेवाडी ते इंदापूरपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून दुरुस्तीचे काम वेगात सुरु आहे.

यातील जाचकवस्ती ते गोतोंडीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. जाचकवस्ती ते गोतोंडीपर्यंत रस्त्याला खड्डे नसल्यामुळे या दरम्यान प्रवाशाकडून वाहनांचा वेग वाढत असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गेल्या तीन-चार दिवसापूर्वी शेळगाव जवळ चारचाकी व दाेन दुचाकी वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. तसेच बेलवाडी जवळ उसाच्या ट्रॅक्टरचे अपघात झाले आहेत. नागरिकांनी बारामती-इंदापूर रस्त्याने वाहन चालवताना वेगाला आवर घालण्याची गरज आहे.

रस्त्याच्या बाजूची झाडे-झुडपे हटविण्याची गरज...
जाचकवस्ती ते गोतोंडी पर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण करुन दुरुस्ती करण्यात आली आहे. या रस्त्यावर नव्याने डांबरीकरणाचे दोन लेअर देण्यता आले असून रस्त्यांची उंची वाढली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्या अरुंद आहेत.तसेच  मोठ्या आकाराचा मुरुम टाकला आहे.तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे-झुडपे असल्याने  वाहनचालकांना वाहन रस्त्याच्या खाली घेण्यास अडचण येत असल्यामुळे झाडेझुडपे काढून मुरुम चोपून घेण्याची गरज आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT