plasma 
पुणे

इंदापुरातील नागरिकांसाठी या 25 जणांचा अहवाल महत्त्वाचा 

प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : भिगवण स्टेशन (ता. इंदापूर) येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील उर्वरित 25 जणांचा कोरोना चाचणी अहवालही निगेटिव्ह आला आहे. यापूर्वी 18 जणांचा अहवालही निगेटिव्ह आला होता, अशी माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. 

भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित महिलेचा गुरुवारी (ता. 30 एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेच्या कुटुंबातील व संपर्कातील एकूण 43 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 18 जणांचा अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आला होता. उर्वरित 25 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा होता. चाचणीनंतर दोन दिवसांनंतरही अहवाल न आल्याने नागरिकांची चिंता वाढली होती. अखेर शनिवारी (ता. 2) सायंकाळी उर्वरित सर्व 25 जणांचा अहवालही निगेटिव्ह आल्याने भिगवणकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. संपर्कातील सर्वच व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आल्याने संबंधित महिलेस कोरोनाचा संसर्ग कोठून झाला, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच आहे. 

याबाबत तहसीलदार मेटकरी म्हणाल्या, ""कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी लॉकडाउन सुरूच राहणार आहे. नागरिकांनी घरात थांबून प्रशासनास सहकार्य करावे.'' भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले, ""कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी घराबाहेर पडू नये.''  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT