the reports of 14 people from Bhor who came in contact with Corona were negative 
पुणे

भोरमध्ये कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या १४ जणांचे रिपोर्ट...

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : वेळू (ता. भोर) येथील एका कंपनीतील एक कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने इतर 14 कामगारांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या सर्व 14 कामगारांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती भोर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे यांनी दिली. त्यामुळे वेळू आणि परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यातील 'या' भागात तीन दिवस संचारबंदी

वेळू येथील एका कंपनीत एक कामगार पुण्यातील बालाजीनगर येथून येत होता. काही दिवसांपूर्वी त्या कामगाराची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तो कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्या कंपनीतील 14 कामगारांचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले होते. तर इतर कामगारांना क्वारंटाईन करण्यात आले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी रात्री त्या कामगारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला. त्यात ते सर्व 14 कामगार कोरोना निगेटीव्ह आढळले. त्या कंपनीत काम करणारे कामगार वेळू, शिंदेवाडी या परीसरातील होते. मात्र त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने परीसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

आता टाटा स्काय, जिओव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे?

याबाबत भोर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे म्हणाले, "त्या कंपनीतील 14 कामगारांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मात्र तरीही पुढील काही दिवस त्या कामगारांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT